Monday , January 20 2025
Breaking News

लोकसंख्येच्या आधारे कर्नाटकात २ राज्यांचा डाव : आ. सतीश जारकीहोळी

Spread the love

बेळगाव : लोकसंख्येच्या आधारावर कर्नाटकचे विभाजन करून २ राज्ये निर्माण करण्याचा डाव भाजपने आखला आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केली. वन मंत्री उमेश कत्ती यांनी बेळगावात बुधवारी २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात ५० नवीन राज्ये निर्माण होणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. उत्तर कर्नाटकाचेही स्वतंत्र राज्य होणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले होते. त्यावर बेळगावात आज प्रतिक्रिया देताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, ३ कोटी राज्यसंख्येचे एक राज्य असेल असा कायदा भाजप सरकार करणार आहे. त्यासाठी लवकरच ते मसुदाही आणतील. कायदा केला की आपोआप कर्नाटकात २ राज्ये निर्माण होतील. याबाबत पंतप्रधान मोदी यांनीदेखील यापूर्वी सूतोवाच केले होते, असे त्यांनी सांगितले.
छोट्या राज्यांमुळे विकास होतो का या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले, विकासाच्या दृष्टीने लहान राज्ये असणे बरे असते. येथे स्वतंत्र राज्य म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण कायद्यानेच नवी राज्ये निर्माण होणार आहेत. स्वतंत्र राज्याची गोष्ट वेगळी आणि आंदोलन करून राज्य मिळवणे वेगळे. तेलंगणाची निर्मिती स्वतंत्र राज्य म्हणून आंदोलनातून झाली. उत्तर कर्नाटक राज्य आंदोलनातून होणार नाही, त्यासाठी भाजप कायदा आणेल. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य हा भाजपचा अजेंडाच आहे. ते जेंव्हा कायदा आणतील तेंव्हा यावर चर्चा करू असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *