Monday , December 8 2025
Breaking News

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा! : उद्धव ठाकरे

Spread the love

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.

विधिमंडळामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. विधानसभेत सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी घटनातज्ज्ञांना विनंती केली की जे काही सुरू आहे याबाबत भूमिका स्पष्ट करावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या असे म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *