माणगांव (नरेश पाटील) : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी उद्या दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजता कुणबी भवन माणगाव येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधनपरिषदचे आमदार जयंतभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस ऍड. आस्वाद शेठ पाटील, विधनपरिषदचे आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील दादा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या ऍड. नीलिमा ताई पाटील, आरडीसीसी बँकेचे व्हा चेअरमन सुरेश शेठ खैरे, जे. बी. सावंत एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मा. नाना सावंत, आर.डी.सी.सी. बँकेचे संचालक अस्लमभाई राऊत हे उपस्थित असणार म्हणून माणगांव ता. शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी वार्तालाप करताना सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta