कोल्हापूर : अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून पाण्याचा विसर्ग दोन लाखांवर नेण्यात आला. अलमट्टी धरण 95 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व दारे खुले करून सर्व पाणी अलमट्टी धरणाकडे सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग
अलमट्टी धरणातून काल दुपारी दीड लाखांवरून पावणे दोन लाख करण्यात आला होता. त्यानंतर संध्याकाळी नऊनंतर पुन्हा विसर्ग वाढवून तो दोन लाखांवर नेण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याचे बोलले जाते. धरणाची पाणी क्षमता 123 टीएमसी असून आता धरणात 117 टीएमसी पाणीसाठा आहे.
Belgaum Varta Belgaum Varta