मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर जोरदार सुनावणी झाली. यावेळी 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta