Tuesday , June 25 2024
Breaking News

माणगांवच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी उत्तम नियोजन करावे : ना. उदय सामंत

Spread the love

माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे माणगांव नगरपंचायतीच्या माणगांव नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलत असताना नगरसेवकांना उद्देशून बोलत असताना उदय सामंत म्हणाले की नवनिर्वाचित नगरसेवकांनी दूरदृष्टी ठेवून माणगांव शहराचा विकास केला पाहिजे. सदर समारंभ अशोकदादा साबळे महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार भरत गोगावले, नूतन नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल नावागणे, माजी अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, ज्येष्ठ नेते राजीव साबळे, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, सर्व नगरसेवक त्याचबरोबर म्हसळा व तळा शहराचे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक/सेविका म्हसळा व तळा शहराचे शिवसेना अध्यक्ष सुजित शिंदे, माणगांव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. महेंद्र मानकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना राजीव साबळे यांनी केली त्यानंतर अनिल नवगणे तसेच प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत व आमदार भरत गोगावले यांचा शाल व श्रीफळ सरस्वतीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उदय सामंत यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, माणगांव च्या जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या. चांगले काम करा असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; ५ महिला जागीच ठार

Spread the love  पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *