Friday , April 17 2026
Breaking News

निपाणीतील गंडेदोरे उताऱ्यांची स्वच्छता!

Spread the love
वार्ता’बातमीचा परिणाम : नागरिकांतून समाधान
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगातही औषधोउपचार सोबत तंत्रमंत्र, उतारा यांचाही आधार घेतला जातो. याचा प्रत्येय
 निपाणी येथील कोल्हापूरवेस मार्गावरील दौलतराव पाटील उड्डाण पुलाजवळ आला. या ठिकाणी अनेक पद्धतीच्या उताऱ्यासह गंडेदोरे पडत होते. या रस्त्यावर शाळकरी मुलापासून महिला आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. उतारे टाकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बातमीचा इफेक्ट होऊन उड्डाणपुल परिसरातील उतारे व गंडेदोरे यांची स्वच्छता केली आहे.
 उड्डाणपूल परिसरात सुया, टाचण्या, टोचलेले लिंबू, नारळ, बाहुल्या, भोपळे, अन्नपदार्थ अशा अनेक वस्तू उतारा काढून या ठिकाणी टाकले जात होते. याबाबत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंट्स क्लबतर्फे पुढाकार घेऊन स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता. शिवाय या ठिकाणी अघोरी प्रकार करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. दोन दिवसात या ठिकाणची स्वच्छता नगरपालिका प्रशासनाने न केल्यास दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व जायंट्स क्लबतर्फे स्वच्छतेची मोहीम हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले होते
तत्पूर्वीच नगरपालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन स्वच्छता केल्याने परिसरातील विद्यार्थी महिला व प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. यापुढील काळात असे अघोरी प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर नगरपालिका प्रशासनाने पथदीपांची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
 यावेळी सुरेश घाटगे, रमेश भोईटे, निकु पाटील, वसंत धारव, महादेव बन्ने, आकाश मल्लाडे, रणजीत मगदूम, विक्रांत पावले, बबन निर्मले, छोटू पावले, महेश बाचणे, सागर पाटील यांच्यासह जायंट्स ग्रुप व फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *