वर्धा – एका बाजूला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी अखंडितपणे लढा देत आहेत. तर,दुसऱ्या बाजूला विदर्भवासीय स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर आजही ठाम आहेत. याचाच प्रत्यय आजपासून सुरू झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी पाहायला मिळाला.
संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले मनोगत सादर करण्यासाठी आले असता, संमेलनाला उपस्थितां मधील काहींनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची जोरदार घोषणाबाजी सुरू केली. महिला आणि युवतींची संख्या अधिक दिसून आली. अचानकपणे सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्रीही काही वेळ गडबडून गेले. मात्र त्यांनी संयम पाळत काही काळ आपले भाषण थांबविले. पोलिसांनी स्वतंत्र विदर्भाची घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन संमेलन स्थळापासून दूर नेले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण पार पाडले.
Belgaum Varta Belgaum Varta