Tuesday , December 9 2025
Breaking News

नरसू पाटील शिक्षण क्षेत्रातला दिशा दर्शक : साई संस्थेच्या स्नेहमेळाव्यात अभिनेते विजय पाटकर यांचे गौरवोद्गार

Spread the love

 

पनवेल : आजच्या महागाईच्या युगात कमी शुल्कात विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा दिशा दर्शक म्हणजे नरसु पाटील. आज डोंबिवलीमध्ये शिक्षण क्षेत्रात ज्यांच्या विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी घेतली आहे. प्रसिद्ध उद्योजिका राजश्री गायकवाड सारखी विद्यार्थी याच शाळेने घडविले आहे. प्रत्येक पालकाने याच संस्थेत मुलांचे प्रवेश घ्यावे असे मी स्वाभिमानाने सांगू इच्छितो आपल्या मुलांचे भवितव्य नरसू भाईच्या हाती सुरक्षित आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो, असे गौरव उद्गार सिने अभिनेते विजय पाटकर यांनी डोंबिवली येथे काढले. साई संस्थेच्या शाळेचा स्नेहमेळावावेळी ते बोलत होते.
डोंबिवली येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी साई संस्थेच्या शाळेचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला सिनेअभनेत्री किशोरी आंबिये, सिनेअभिनेता विजय पाटकर, सिने अभिनेता जयवंत भालेकर, सिने अभिनेता नाथा, कला दिग्दर्शक विशाल सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात नरसू पाटील म्हणाले, आपल्या प्रत्येक मुलांचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. आजपर्यंत आपल्या संस्थेच्या 5 शाळा व मेडिकल विद्यालय सुद्धा आहे. येत्या 5 ते 6 वर्षात इंजिनियरसह शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शाखा सुरू करण्याचा साई संस्थेचा मानस आहे.
साई संस्थेच्या सर्व शाळांचा निकाल 100 % लागतो याचे खऱ्या अर्थाने श्रेय मुख्याध्यापक संदीप पिलाकर श्रेया बगावे, नंद किशोर वडविंदे, संगीता पासल संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांना जातो. या संस्थेत मनोज गोसावी, सुनील, संतोष यांचे सुद्धा काम वाखण्याजोगे आहे. यावेळी सिने अभिनेत्री किशोरी अंबीये यांनी मी महाराष्ट्रतील अनेक शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला मी जाते पण साई संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रगती पाहून मी थक्क झालेली आहे. ही महराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची संस्था आहे असे मला वाटते.
यावेळी सिने अभिनेते जयवंत भालेकर व नाथा भाऊ यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला संस्थेचे सचिव ब्रह्मानंद पाटील यांनी विद्यार्थ्यानी गुणवते बरोबर सर्वच क्षेत्रात गरुड भरारी घ्यावी. शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक पाल्याला अष्टपैलू बनवण्याचे काम हे संस्थेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन शिक्षण क्षेत्रात प्रचंड काम करण्याची इच्छा आहे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठावर पद्मिनी पाटील, डॉ. प्रणाली पाटील, सोनाली पाटील, शाळेची माजी विद्यार्थिनी उद्योजक राजेश्री गायकवाड, विशाल सावंत, बिजक्षी राय, ऑडिटर संदीप जाधव, विनोद पाटील, गोपाळ लांडे, संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, हजारो पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांचे अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले तर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *