रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री, आमदार, खासदार या सोहळ्याला उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला आज (शुक्रवार) सकाळी साडेआठ वाजता किल्ले रायगडावर सुरूवात झाली. येथे उभारलेल्या राजदरबारात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
आजच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे आदी मान्यवर उपस्थित आहेत. गडावरील हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त कालपासूनच गडावर दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी मुख्य सोहळ्याला सुरूवात झाली.