Tuesday , March 3 2026
Breaking News

उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात; राज्य सरकारचा निर्णय

Spread the love

 

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून कपात करण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत साधारणपणे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. मात्र, आता या सर्वांनाच आधीच्या जागेवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा होती तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबियांसह मातोश्रीच्या परिसरातील सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. मातोश्रीच्या मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलीसांचा पहारा असायचा. मात्र, आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *