माणगांव (नरेश पाटील) : आदिवासी समाजामध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याकरिता मुंबई प्रांत संचलित हेल्थ प्रमोशन संस्थाकडून दक्षिण रायगड जिल्हा विभागाचा मेळावा मंगळवार दिनांक 15 रोजी पार पडला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष फादर रॉकी बान्स(मुंबई), सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील(पेण), फा. डायगो (नागोठणे), फा. रुडोल्फ(रोहा) तसेच अमरदीप संस्थेच्या अध्यक्षा रुबिन ताई(माणगांव)उपस्थित होते.
या मेळाव्याचा मुख्य उद्देश आदिवासी समाजामध्ये वनस्पती तसेच आरोग्याविषयी जनजागृती करणे तसेच औषधी वनस्पतींचे जतन करून जंगल भागातील औषधी वनस्पतींचे सेवन करण्यासाठी प्राधान्य देन्यात आले. तसेच आदिवासी समाजाने औषधी वनस्पतीचे शिक्षण आत्मसात करून आपल्या समाजासाठी या शिक्षणाचा उपयोग करून सुदृढ आरोग्याची क्रांती करण्याचे उद्दीष्ट मांडण्यात आले. तसेच पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाड, माणगांव, तळा, कोलाड, रोहा, नागोठणे, कोर लई या भागातून आदिवासी समाज आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पना डाबरे यांनी केले तर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
