Wednesday , March 4 2026
Breaking News

मुंबईत खासगी विमान कोसळलं, सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती

Spread the love

 

मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमध्ये बसलेले काही प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं.

प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंग करताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्ससह 8 जण प्रवास करत होते.

नेमकी दुर्घटना कशी झाली?

हे खासगी विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत होतं. मुंबईत सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सध्या खराब हवामान आहे. विमानाचं जेव्हा लँडिंग होत होतं, त्यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे खासगी विमान कोसळलं आणि भीषण दुर्घटना घडली.

 

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *