Monday , December 8 2025
Breaking News

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट!

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोलला धमकीचा फोन आला आहे. मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत असून आणि हल्ल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती एका निनावी व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून दिली. यानंतर यंत्रणा हा अलर्ट मोडवर आल्या आणि या फोननंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला.

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला होता. यानंतर हा फोन आणि या व्यक्तीचा शोध सुरु झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे निष्पन्न झालं. कॉल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

अनेक वेळा धमकीचे फोन
मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा असे फेक कॉल येत असतात. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं.

ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी
त्याआधीही मुंबई कंट्रोल रुमला अनेक वेळा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. 6 ऑगस्ट रोजीही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तीने दिली होती. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर या व्यक्तीला अटक करुन त्याची चौकशी करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या. यानंतर अवघ्या काही तासांत या आरोपीला अटक करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *