
कोल्हापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिली.
तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला या अपघातामध्ये किरकोळ दुखापत झाली. अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना हा अपघात घडला.
Belgaum Varta Belgaum Varta