
पनवेल : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरी शेठ फडके यांचे निधन वडिलांच्या काळापासून 1986 पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. हातात आणि गळ्यात किलोभर सोने घालून बैलगाडा शर्यती मध्ये गाडीचे टपावरती नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास 40-50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta