
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेत.
काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta