Saturday , July 27 2024
Breaking News

रायगड जिल्ह्यात जून महिन्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन : मंत्री आदित्य ठाकरे

Spread the love


माणगांव (नरेश पाटील) : बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून एक भव्य रोजगार मेळावा येत्या जून महिन्यात रायगड येथे घेण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवार दि. 30 मार्च रोजी आयोजित विशाल जाहीर सभेत बोलताना सांगितले. ही जाहीर सभा टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालयाचे मैदान बामणोली रोड येथे पार पडली.
यावेळी व्यासपीठावर नामदार आदित्य ठाकरे यांच्यासह माणगांवचे सुपुत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते तथा मुबंई म्हाडाचे अध्यक्ष डॉ. विनोद घोसाळकर, मुंबई महानगर पालिकेचे माजी महापौर तथा रायगडच्या संपर्क मंत्री किशोरीताई पेडणेकर, रायगडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, प्रकाश सुर्वे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, मनोहर भोईर, शिवसेना पक्ष रायगडचे माजी अध्यक्ष बबनदादा पाटील, प्रमोद घोसाळकर, मुंबईचे काही शिवसेना महिला पदाधिकारी, रायगड जिल्हा पदाधिकारी, जिल्हा युवा सेना अध्यक्ष विकास गोगावले, विद्यमान दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, शिवसेना नेते राजीव साबळे, जिल्हा सचिव डॉ.संतोष कामेरकर, माणगांव तालुका शिवसेना माजी अध्यक्ष अरुण चाळके, विद्यमान अध्यक्ष गजानन अधिकारी, माणगांव न. पं. अध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, शिवसेना शहर अध्यक्ष तथा स्वच्छता सभापती अजित तार्लेकर, महिला, बाल व युवकल्याण सभापती शर्मिला सुर्वे, नगरसेवक दिनेश रातवडकर, कपिल गायकवाड, माजी स्वीकृत नगरसेवक बामुगुडे, विद्यमान स्वीकृत नगरसेवक हेमंत शेठ, माणगांव युवसेना उपशहर युवा अधिकारी सुमित काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
ना. आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, शिवसेनेच्याबाबतीत जनतेमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना प्रचंड वेगाने वाढत आहे. आजच्या या सभेत विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केल्यामुळे स्पष्ट होत आहे की, त्यांचे शिवसेना पक्षाबद्दल विश्वास अधिक दृढ बनले आहे. इंधन, महागाईबाबत नाराजी व्यक्त करून करून बेरोजगाराबद्दल सांगितले. येत्या जून महिन्यात रायगड जिल्ह्यात भव्य रोजगार मेळावा आयोजित करणार.
कोविड, दोन चक्रीवादळे, पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे या विषयांवरही बोलून महाविकास आघाडी सरकारने कोकणच्या जनतेला भरीव मदत केल्याची सांगितले. राजकारण करताना समाजकार्याला 80 टक्के आम्ही प्राधान्य देत आहोत. माणगांव नगरातील भेडसावणार्‍या समस्या आम्ही येत्या काळात सोडवणार त्याचबरोबर पुढील वर्षापर्यंत नाट्यगृह नक्कीच पूर्ण बांधून लोकार्पण करू असेही शेवटी त्यांनी सांगितले.
मंत्री उदयजी सामंत व मंत्री सुभाष देसाई यांनीही आपले विचार मांडले.
यादरम्यान शाम भोकरे, करंजोले ठाकरे, किशोरी पेडणेकर, विकास गोगावले, मनोहर भोईर, बबनदादा पाटील, आमदार भरत गोगावले, डॉ. विनोद घोसाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपप्रमुख नितीन पवार व माजी सभापती महेंद्र तेटागुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माणगांव नगर पंचायतकडून मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुष्पहार अर्पण करून व एक भव्य देवीची प्रतिमा भेट देऊन गौरव करण्यात आला. तर दुसरीकडे माणगांव नगर पंचायतवर भगवा फडकवल्याबद्दल नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सन्मान केला.

About Belgaum Varta

Check Also

सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Spread the love  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *