खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील यल्लापूर खानापूर महामार्गावरील झुंजवाड के. एन. गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन नागरिकाना बसने पाठीमागुन जोराने ठोकरल्याने एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी दि ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शांताराम विठ्ठल पाटील (वय ४३) व परशराम यल्लापा पाटील (वय ३०) हे दोघे झुंजवाड के. एन. गावचे रहिवाशी असून दोघे रस्त्याच्या कडेला थांबले होते. यावेळी बसने मागुन ठोकरल्याने शांताराम विठ्ठल पाटील हे जागीच ठार झाले. तर परशराम यल्लापा पाटील याच्या कंबरेला जबर मार लागला.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गंभीर जखमी झालेल्या परशराम यल्लापा पाटील याला लागलीच उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी नंदगड पोलिसांनी पंचनामा केला.
मृत शांताराम विठ्ठल पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील असा परिवार आहे.
शांताराम विठ्ठल पाटील यांच्या मृत्यमुळे झुंजवाड के. एन. गावावर शोककळा पसरली आहे.
