Saturday , October 19 2024
Breaking News

सावंतवाडी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

Spread the love


सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारे सन 2021 व सन 2022 चे जिल्हास्तरीय मानाचे ’ज्ञानदीप पुरस्कार’ रविवारी 17 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींच्या प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार करुन संस्थेचे खजिनदार एस. आर. मांगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ज्ञानदीप पुरस्कार निवड समितीमधून खालील व्यक्तींची पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.
ज्ञानदीप ही संस्था गेली 16 वर्षे सक्रिय कार्यरत असून समाजात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित करते.
यात शिवराम गणेश जोशी माणगाव- कुडाळ यांची सहकार, देशप्रेम, सामाजिक कार्यासाठी निवड करण्यात आली आहे.डिजिटल पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी संपादक सागर दत्ताराम चव्हाण, सावंतवाडी यांची निवड करण्यात आली.
उत्कृष्ट अंगणवाडी शिक्षिका म्हणून हेमा हरिश्चंद्र नाईक, मोरगाव – दोडामार्ग, कला संगीत क्षेत्रातील कार्यासाठी महेश लवू कांडरकर तळवडे-सावंतवाडी, उत्कृष्ट शिक्षकेत्तर कार्यकर्ता म्हणून सुनिल शांताराम नाईक, तुळसुली-कुडाळ, शैक्षणिक व ग्राहक चळवळ कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रा. सुरेश नारायण पाटील, वैभववाडी यांची निवड करण्यात आली आहे. तर उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी सुर्यकांत आनंद सांगेलकर बांदा-सावंतवाडी, उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी शामल शंकर मांजरेकर-वेंगुर्ला, उत्कृष्ट शैक्षणिक संशोधन कार्यासाठी अनुष्का नागेश कदम-मालवण यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेत.
या पुरस्कारांची निवड संस्थापक अध्यक्ष तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, प्रा. रूपेश पाटील या निवड समितीने केली. या बैठकीत ज्ञानदीपशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे या संस्थेचे लेखापरीक्षक विजय सावंत-मळगाव व ओमकार प्रिंटिंग प्रेस मळगावचे गंगाराम निगूडकर यांचं नुकतंच निधन झाल्यानं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *