Thursday , October 24 2024
Breaking News

ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

Spread the love

 

मुंबई : महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेना युबीटी पक्षाकडून अधिकृत ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, ४० पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत ६५ जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील १३ मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने १५ पैकी १४ आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार

१. १७ – चाळीसगाव : उन्मेश पाटील

२. १८ – पाचोरा: वैशाली सुर्यवंशी

३. २५ – मेहकर (अजा): सिध्दार्थ खरात

४. २९ – बाळापूर: नितीन देशमुख

५. ३१ – अकोला पूर्व: गोपाल दातकर

६. ३४ वाशिम (अजा): डॉ. सिध्दार्थ देवळे

७. ३७ – बडनेरा: सुनील खराटे

८. ५९ – रामटेक: विशाल बरबटे

९. ७६ – वणी: संजय देरकर

१०. ८८ – लोहा: एकनाथ पवार

११. ९३ – कळमनुरी: डॉ. संतोष टारफे

१२. ९६ – परभणी: डॉ. राहुल पाटील

१३. ९७ गंगाखेड: विशाल कदम

१४. १०४ – सिल्लोड: सुरेश बनकर

१५. १०५ – कन्नड: उदयसिंह राजपुत

१६ १०७ – संभाजीनगर मध्य: किशनचंद तनवाणी

१७. १०८ – संभाजीनगर प. (अजा): राजु शिंदे

१८. ११२ – वैजापूर: दिनेश परदेशी

१९. ११३ – नांदगांव: गणेश धात्रक

२०. ११५ – मालेगांव बाह्य : अद्वय हिरे

२१. १२१ – निफाड: अनिल कदम

२२. १२४ – नाशिक मध्य: वसंत गीते

२३. १२५ – नाशिक पश्चिम: सुधाकर बडगुजर

२४. १३० – पालघर (अज) : जयेंद्र दुबळा

२५. १३१ बोईसर (अज): डॉ. विश्वास वळवी

२६. १३४ – भिवंडी ग्रामीण (अज): महादेव घाटळ

२७. १४० – अंबरनाथ (अजा): राजेश वानखेडे

२८. १४३ – डोंबिवली: दिपेश म्हात्रे

२९. १४४ – कल्याण ग्रामिण: सुभाष भोईर

३०. १४६ – ओवळा माजिवडा: नरेश मणेरा

३१. १४७ – कोपरी पाचपाखाडी : केदार दिघे

३२. १४८ – ठाणे : राजन विचारे

३३. १५० – ऐरोली: एम. के. मढवी

३४. १५४ – मागाठाणे: उदेश पाटेकर

३५. १५६ – विक्रोळी : सुनील राऊत

३६. १५७ – भांडुप पश्चिम: रमेश कोरगावकर

३७. १५८ – जोगेश्वरी: पूर्व अनंत (बाळा) नर

३८. १५९ – दिंडोशी : सुनील प्रभू

३९. १६३ – गोरेगांव: समीर देसाई

४०. १६६ – अंधेरी पूर्व: ऋतुजा लटके

४१. १७३ – चेंबूर: प्रकाश फातर्पेकर

४२. १७४ – कुर्ला (अजा): प्रविणा मोरजकर

४३. १७५ – कलीना: संजय पोतनीस

४४. १७६ – वांद्रे पूर्व: वरुण सरदेसाई

४५. १८१ – माहिम: महेश सावंत

४६. १८२ – वरळी: आदित्य ठाकरे

४७. १८९ – कर्जत: नितीन सावंत

४८. १९० – उरण: मनोहर भोईर

४९. १९४ – महाड: स्नेहल जगताप

५०. २२१ – नेवासा: शंकरराव गडाख

५१. २२८ – गेवराई: बदामराव पंडीत

५२. २४२- धाराशिव: कैलास पाटील

५३. २४३ – परांडा: राहुल ज्ञानेश्वर पाटील

५४. २४६ – बार्शी: दिलीप सोपल

५५. २५१ – सोलापूर दक्षिण: अमर रतिकांत पाटील

५६. २५३ – सांगोले: दिपक आबा साळुंखे

५७. २६१ – पाटण: हर्षद कदम

५८. २६३ – दापोली: संजय कदम

५९. २६४ – गुहागर: भास्कर जाधव

६०. २६६ – रत्नागिरी: सुरेंद्रनाथ (बाळ) माने

६१. २६७ – राजापूर: राजन साळवी

६२. २६९ – कुडाळ: वैभव नाईक

६३. २७० – सावंतवाडी: राजन तेली

६४. २७२ – राधानगरी: के.पी. पाटील

६५. २७७ – शाहूवाडी: सत्यजीत आबा पाटील

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर

Spread the love  रायगड : शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेण मतदारसंघातून उमेदवार जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *