
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमाशी बोलताना केली. मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला. राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झालेली शिवसेना या सर्व परिस्थितीवर बोलत असताना दरेकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृह खाते गप्प का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. या परिस्थितीवरून भाजपने राज्यातील कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप केला आहे. भाजपचे शिष्टमंडळ या प्रकरणी राज्यपालांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राणा दाम्पत्य आणि मोहीत कंबोज यांच्यावरील शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेवरून भाजपने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta