सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे.
रोहित पाटील यांनी शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, रोहित पाटील मतमोजणीच्या २० व्या फेरीत एक लाख २६ हजार मताधिक्याने विजयाच्या दिशेने आघाडी घेतली आहेत, तर संजयकाका पाटील यांंना ९९ हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत, यामुळे रोहित पाटील यांना मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे ते तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आता सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta