एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीनं 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनं 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर महायुतीकडे 236 जागांचं संख्याबळ आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं असल्याने घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन केलं जाणार आहे. 26 तारखेला जरी या सरकारची मुदत संपत असली तरी एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. तोपर्यंत राज्यात आणि केंद्रात चर्चा पूर्ण करून 28 ते 29 तारखेपर्यंत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नवनिर्वाचित आमदारांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षानं अजित पवार यांची देखील पक्षाच्या गटनेते पदी निवड केलेली आहे. भाजपची भाजपची पार्लमेंट्री बोर्डाची मीटिंग होणे आवश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta