पुणे : अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात डंपरने चिरडले. पुण्यात काम शोधण्यासाठी आले, डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. त्याची चौकशी सुरू आहे.
पुण्यात काल रात्री एका भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले आहे. त्यात तीन चिमुरड्यांना जागीच मृत्यू झाला आहे तर सहाजण जखमी झाले आहे. अमरावतीवरुन पुण्यात कामासाठी आलेल्या कामगारांना चिरडले आहे. याप्रकरणी आता डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गजानन तोटे असं डंपर चालकाचे नाव आहे. चालक भरधाव वेगात डंपर चालवत होता. तीव्र उतार असल्याने त्याच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले अन् वाहन थेट फुटपाथवर गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ३ निष्पाप चिमुकल्यांना मृत्यू झाला आहे.
पुण्यातील या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावतीहून एकूण 12 जण पुण्यात कामासाठी आले होते. त्यातील ९ जणांना डंपर चालकाने चिरडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
मृत्युमुखी पडलेल्या बालकांची नावे
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावे
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे