Wednesday , March 4 2026
Breaking News

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

 

मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे.

हे आंदोलन गेल्या आंदोलनापेक्षा पाच पट मोठे असेल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक गावांना भेटी देखील दिल्या आहेत. अनेक दौरे केले. त्यानंतर आता 29 ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारने मराठा उपसमितीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मराठा उपसमितीचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत, पूर्वी चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते, आता राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत. सरकारकडून मराठा उपसमितीचे पुर्नगठण करण्यात आलं आहे. पूर्वी अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे आता या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. या समितीमध्ये एकूण 12 सदसस्य आहेत.

ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे, भोसले, कोकाटे, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे सर्व मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत. ही समिती मराठा समाजाच्या शौक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतचा आढावा घेत राहणार आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून मराठा उपसमितीचं पुर्नगठण करण्यात आलं आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *