खानापूर (प्रतिनिधी) : मेरड्याजवळील (ता. खानापूर) नागरगाळी महामार्गावरील रस्त्यावर नविन सिडी बांधलेल्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे नागरगाळी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकाना धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून रात्री अपरात्रीच्यावेळी येथून ये-जा करताना वाहन खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. किंवा एखाद्याचा जीव जाण्याचा प्रसंग ओढवतो. तेव्हा संबंधित खानापूर तालुका सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात खड्ड्याची पाहणी करून संबंधित कंत्राटदाराला जाब विचारून खड्डा बुजवून सिडीचे काम व्यवस्थित करून देण्याची सुचना करावी. अन्यथा खड्डा बुजविण्यासाठी ग्रामस्थ रास्तारोको करण्याच्या पवित्र्यात आहे. अशी माहिती हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य रणजीत पाटील यांनी दिली.
तेव्हा भविष्यात अपघात होऊ नये यासाठी मेरड्याजवळच्या रस्तावरील खड्डा बुजवावा अशी मागणी ही केली आहे.
