बेळगाव : बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने तसेच बेळगांव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरातील 60 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहे. अशा कुटूंबाची महिती घेऊन आज मंडळाच्यावतीने किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे फौजदार आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी तसेच बापट गल्लीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी नागनाथ मठ स्वामीजी यांच्या हस्ते पूजन आणि आरती होऊन या सेवाकार्याला सुरुवात झाली.
यावेळी नवहिंद मंडळाचे लोकनाथ रजपूत, रोहित मुरकुटे, प्रताप मोहिते, चेतन किल्लेकर, राजू पवार, शुभम किल्लेकर, बाबू हनमशेठ, उत्तम रजपूत, कार्तिक गवाने, अनुराग केसरकर, अंकुश पवार, पवन कळसाई, उमेश बाळेकुंद्री, सोहन पाटील, श्लोक गवंडी, अभिषेक कळसाई, नितीन जाधव, रामा शेट्टी, गणपत रजपूत, विनय मुरकुटे, नागेश मुरकुटे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …