बेळगाव : चर्मकार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीपाद बेटगिरी आणि त्यांच्या पत्नी निलम बेटगिरी यांनी काल गुरुवारी आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस स्तुत्य उपक्रमासह साजरा केला. सामाजिक बांधिलकीचे ध्यान राखून बेटगेरी दाम्पत्याने सिद्धार्थ बोर्डिंग येथील गरीबांसोबत आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्याचबरोबर लग्नाच्या रौप्यमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोर्डिंगला दहा हजार रुपयांची देणगीही दिली.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात अध्यक्षस्थानी पत्रकार श्रीकांत काकतीकर उपस्थित होते. यावेळी चर्मकार समाजाचे नेते रवी शिंदे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता भीमराव पवार, चंद्रकांत चव्हाण, सदानंद कदम, किरण शिंदे, दिनकर चव्हाण, हिरालाल चव्हाण यांनी बेटगिरी दाम्पत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, त्यांनी चालविलेल्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले.
बेटगिरी दाम्पत्याने वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोर्डिंगला दहा हजार रुपयांची मदत, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी यांच्याकडे सुपूर्द केली. या कार्यक्रमात संतोष होनगल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सिद्धार्थ बोर्डिंगच्या व्यवस्थापिका पवित्रा हिरेमठ यांनी आभार मानले.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …