Tuesday , February 27 2024
Breaking News

राष्ट्रीय पक्षांकडून खानापूर-रामनगर रस्त्याचे श्रेय लाटल्याचा प्रयत्न

Spread the love

खानापूर म. ए. युवा समितीचा आरोप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर रस्त्याचे काम रखडल्याने मे महिन्यातच या रस्त्याचे फोटो व छायाचित्रण करून खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्यासंदर्भात निवेदन सादर केले. व त्याचे लक्ष वेधुन घेतले. लागलीच तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी याचे त्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सोमवारी शिवस्मारकात झालेल्या बैठकीत केला.
यावेळी भाजपच्या नेत्यांनी खासदार अनंतकुमार हेगडे या रस्त्यासाठी १० कोटी रूपयाचा निधी मंजुर करून आणला, असे सांगितले तर तालुक्याच्या आमदार निंबाळकर यांनी तो कसा १० कोटी रूपयाचा निधी नाही व तालुक्याला कसे फसविले जाते. हे दाखविण्यासाठी रूमेवाडी क्राॅसवर रास्तारोको करून आंदोलन केले. तालुक्यातील इतर समस्येवरून लोकांचे लक्ष कसे विचलित करण्यासाठी रास्तारोकोचा मार्ग पत्करला. एकंदरीत दोन्ही राष्ट्रीय पक्षाकडून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. याचा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने बैठकीत निषेध जाहीर केला.
यावेळी बैठकीत सत्तेवर असलेल्या पक्षाला गेली ३ वर्षे खोट्याचा आधार घ्यावा लागतो. तर दुसऱ्या पक्षाने तालुक्यात सत्तेवर असताना त्यापक्षाला आंदोलन सारख्या गोष्टी कराव्या लागतात.  हे खानापूर तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.
समितीच्या आमदारांनी विरोधी पक्षात राहुन तालुक्याच्या विकासात कधी खंड पडू दिला नाही. मात्र खानापूरात दोन्ही राष्ट्रीय पक्षानी विकासाचे गाजर दाखवून तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. दोन्ही पक्षाना याचे कोणतेही सोयरसुतक नाही. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
यापुढे ही युवा समिती तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले.

अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, मध्यवर्तीचे सदस्य रणजीत पाटील, विनायक सावंत, मारुती गुरव, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, राजू कुंभार, बाळकृष्ण पाटील, रामचंद्र गावकर, विशाल बुवाजी, किशोर कुरिया आदी पत्रकार परिषदेत हजर होते.

About Belgaum Varta

Check Also

डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असो. सरचिटणीस पदी सुनील जाधव अविरोध

Spread the love  बेळगाव :बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनच्या सरचिटणीस पदी सुनील विजयानंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *