बेळगाव : नियती फाउंडेशनच्यावतीने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या सदस्यांना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण करण्यात आले.
कोरोना काळात शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तसेच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने रात्रंदिवस घराबाहेर राहून सेवा बजावत असलेल्या शहापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियती फाउंडेशनच्या वतीने आज गुरुवारी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या वितरित करण्यात आल्या.
शहापूर पोलीस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांना मुक्तीधामचे सचिव आणि खजिनदार संदीप खन्नुकर यांनी गोळ्या प्रदान केल्या. राघवेंद्र हवालदार यांनीही नियती फाउंडेशन आणि मुक्तिधामच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले. मुक्तिधामचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर, सदस्य हिरालाल चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
