
चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला.
तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जवळपासच्या भागातील लोकांची मोठी गर्दी होती. या कार्यक्रमात सहभागी भाविक मंदिराचा रथ रस्त्यावरून ओढत असताना विजेची तार अडकली. यामुळे 2 लहान मुलांसह 10 जणांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या इतर अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे विजेचा धक्का बसला त्यावेळी जवळपास ५० भाविक दूर फेकले गेले. तसेच अनेकांनी पळ काढला. त्यामुळे मोठई जीवितहानी टळली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास तिरुचिल्लापल्ली पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी व्ही. बाळक्रिष्णन यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta