Sunday , July 26 2026
Breaking News

सूरजकुंड मेळ्यात फिरता पाळणा कोसळला; पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, १३ जण जखमी

Spread the love

 

फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. या मेळ्यातील फिरता पाळणा (झुला) अचानक तुटला आणि खाली कोसळला. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला असून १२ जणापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच घबराट पसरली होती.

सूरजकुंड मेळ्यादरम्यान फिरता पाळणा (झुला) अचानक कोसळ्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी घडली असून या घटनेत जखमींना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “या अपघातात एकूण १३ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उपायुक्त, पर्यटन व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्हा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पुढील दुर्घटना टाळण्यासाठी या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.”

तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *