सामाजिक कार्यकर्ते ’टार्गेट’
नवी दिल्ली : देशात 2010 ते 2021 या 11 वर्षांच्या काळात देशद्रोहाच्या कलमाखाली तब्बल 867 गुन्हे दाखल करण्यात आले. पंरतु, यापैकी केवळ 13 आरोपींविरोधात आरोप सिद्ध झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण 13 हजार आरोपींपैकी केवळ 0.1 टक्केच आरोपी दोषी आढळल्याची माहिती यासंबंधीची आकडेवारी ठेवणार्या ‘आर्टिकल 14’ या संकेतस्थळाने दिली आहे.
अहवालानुसार देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला जामिनासाठी सरासरी 50 दिवस तुरुंगात काढावे लागले. जामिनासाठी कुणी उच्च न्यायालयात धाव घेतली, तर त्याला सरासरी 200 दिवस तुरूंगात काढावे लागले.
अहवालानूसार 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर 2021 पर्यंत देशद्रोहाचे 595 गुन्हे दाखल करण्यात आली. म्हणजेच 2010 पासून दाखल एकूण गुन्ह्यांपैकी 69% गुन्हे एनडीए सरकारच्या कार्यकाळातच दाखल झाले. आकडेवारीनुसार 2010 नंतर यूपीए सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी सरासरी 68, तर एनडीएच्या कार्यकाळात सरासरी 74.4 गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच पोलीस स्टेशन, एनसीआरबी अहवाल तसेच इतर माध्यमातून ही आकडेवारी जमा केल्याचा दावा संकेतस्थळाकडून करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा ठपका
सामाजिक कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले. जवळपास 99 गुन्ह्यांमध्ये 492 सामाजिक कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. तर, शैक्षणिक आणि विद्यार्थी क्षेत्रातील 69 गुन्ह्यांमध्ये 144 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला. 117 राजकीय कार्यकर्त्यांवर 66 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वसामान्य कर्मचारी तसेच व्यापार्यांविरोधात 30 गुन्ह्यांमध्ये 55 लोकांना आरोप बनवण्यात आले आहेत. पत्रकारांविरोधात 21 गुन्हे दाखल करून 40 जणांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यात आल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …