नानपारा : लखीमपूर महामार्गावर नैनिहाजवळ रविवारी पहाटे एका वेगवान ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानपारा-लखीमपूर महामार्गावरील नैनिहा गावाजवळ रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींना सीएचसीमधून बहराइच मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलंय.
हे प्रवासी कर्नाटकातून लखीमपूरमार्गे अयोध्येला जात होते, असं सांगण्यात येतंय. मात्र, पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीय. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, एसएसपी केशव कुमार चौधरी यांनी अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची काळजी घेत त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री योगींनी दु:ख व्यक्त केलं
सीएम योगी यांनी बहराइच जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केलीय.
Check Also
आयटी कंपन्यानाही लाल-पिवळा फडकावण्याची सक्ती
Spread the love बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने …