अहमदाबाद : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. २ जून रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पटेल यांनी गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का होता.
मी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. मला विश्वास आहे की, माझ्या या निर्णयाचे स्वागत गुजरातमधील जनता आणि माझे साथीदार करतील, असा मला विश्वास आहे. मला वाटतं की, या निर्णयानंतर मी भविष्यात गुजरातसाठी सकारात्मक दृष्टीकाेनातून कार्य करेन, असे हार्दिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पाटीदार नेता व गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा मागील काही दिवस गुजरातच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. भाजप नेतृत्वाचे कौतुक करत काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमटही त्यांनी वारंवार व्यक्त केली होती. भाजपचे नेते धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत, असे सूचक विधानही त्यांनी मागील महिन्यात केले होते.
Check Also
गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार
Spread the love रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे …