पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकार्यांनी सोमवारी सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस 38% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती खचऊ ने दर्शविले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या मध्यवर्ती भागांमध्ये अँटी-चक्रीवादळाची उपस्थितीसुद्धा मान्सूनच्या प्रगतीसाठी चांगलं लक्षण नाही. यामुळे मान्सून सामान्य राहत नाही. देशाच्या काही पावसाच बदल होताना दिसत आहे. कारण, अरबी समुद्रातील प्रवाह खूपच कमकुवत आहे.
मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे अद्याप काहीही संकेत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही.
काय आहे हवामानाचा अंदाज?
दक्षिण कोकणात बुधवारपासून तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. यावेळी वार्यांचाही वेग वाढलेला असेल, असा अंदाज आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. तर औरंगाबाद आणि जालना येथे बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
