मुंबई : शनिवारी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली आहे. आज आर्यन खान याला कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे.
शाहरुख खानच्या मुलाला मोठा दणका कोर्टाने दिला. आर्यन खानने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली होती. आता मात्र त्याला तीन रात्री कोठडीत काढाव्या लागणार आहेत. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या तीन रात्री एनसीबी कोठडीत असणार आहेत.
आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. त्याला पाहुणा म्हणून पार्टीत नेलं होते, वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात दावा केला. तर अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडले असा एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दावा केला. आर्यनच्या चॅटमध्ये धक्कादायक माहिती मिळाल्याचा एनसीबीने दावा केला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा एनसीबीकडून दावा करण्यात आला आहे. याबाबतच्या तपासासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळावी अशी मागणी एनसीबीने केली होती.
Check Also
अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट
Spread the love मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज …