बंगळूरू : राज्याचे नुतन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून 2003 च्या बॅचचे आयआयएस अधिकारी मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपला होता. त्यामुळे रिक्त जागेवर मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी मनोजकुमार मीना यांना राज्य गृहसचिव पदावरून मुक्त करण्याचे आदेश जारी केले आणि त्यांना राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले.
