निपाणी : श्रीपेवाडी येथे मराठी शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले आल्या असता श्रीपेवाडी येथील ग्रामस्थानी दलित सर्वसामान्य गरजू नागरिकांना जागा देण्याबाबत निवेदन दिले.
श्रीपेवाडी-जत्राट ग्राम पंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर श्रीपेवाडी- जत्राट गावातील विधवा गरीब दलित व इतर समाजातील लोकांना ही जागा द्यावी, या आशयाचे निवेदन उपस्थितांच्या हस्ते मंत्री शशिकला जोल्ले यांना देण्यात आले.
यावेळी, देवगोंडा शिंपुगडे म्हणाले, श्रीपेवाडी- जत्राट हद्दीतील गायरान जागेवर निपाणी येथील एका विशिष्ट समाजाला घरकुल योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. ह्या प्रस्तावाला श्रीपेवाडी- जत्राट ग्रामस्थानचा विरोध असून त्या जागेवर श्रीपेवाडी- जत्राट येथील विधवा, एससी एसटी व इतर समाजातील गोर गरीब लोकांना या जागेवर घरे बांधून द्यावी अशी विनंती करणारे निवेदन श्रीपेवाडी ग्रामस्था कडून मंत्री जोल्ले यांना देण्यात आल्याचे सांगितले. प्रशांत हांडोरी म्हणाले, श्रीपेवाडी-जत्राट ग्रामपंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर दीनदलित गरीब व इतर समाजातील लोकांना ही जागा देण्यासंदर्भात मंत्री महोदयासह जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालय यांना निवेदन दिल्याचे सांगितले. याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य विजय पोवार, प्रशांत हांडोरी, देवगोंडा शिंपूकडे, श्रीनिवास शिंदे, राजू पोवार, जीवन पाटणकर,श्रीकांत कुंभार, विनायक पठाडे, बाळासो कांबळे, आप्पासो कांबळे, स्वप्नील वडगावे, पोपट जाधव, शिवानंद कांबळे, सुशांत वडगावे, स्वप्नील कांबळे, सुशांत कांबळे, चंद्रकांत कांबळे, ओंकार कांबळे, विनायक जाधव, बंडा भिवशे, राकेश कांबळे, संतोष सुतार, राहुल खंडे उपस्थित होते.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …