खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी नि. अंकली शाखेचे उद्घाटन सोहळा शनिवारी विरेश कॉम्प्लेक्स पहिला मजला येथे पार पडला.
यावेळी शाखेचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर, माजी राज्यसभा सदस्य व केएलई संस्था कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, मुख्यसचेतक विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार दिगंबर पाटील, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर आदीच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, सहकार क्षेत्राचे दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहकाचा विश्वास संपादन करून व्यवहार निटनेटकेपणाने केल्यास सोसायटीची प्रगती लवकर होते. तेव्हा संचालक मंडळाने सर्वतोपरीने प्रयत्न करून सोसायटीची प्रगती साधावी, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष बसवराज होंडदकट्टी, अध्यक्ष महांतेश पाटील, प्रधान व्यवस्थापक डी. एस. करोशी, खानापूर शाखा संचालक महांतेश राऊत, बसप्पा बशेटी, श्रीकांत पाटील, नारायण चोपडे, बसवराज सानिकोप, संतोष हंजी, मोहमदशफी खाजी, तसेच शाखा व्यवस्थापक विनोद मोहिते आदी उपस्थित होते.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …