आर. एच. मोतीवाला : बैठकीत दिली माहिती
निपाणी : निपाणीतील रत्नशास्त्र व्यवसायात काम करणारे स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांचे शुभरत्न केंद्र फक्त निपाणीतच असून या व्यतिरिक्त कोठेही हा शुभरत्न केंद्राचा व्यवसाय सुरू नाही. निपाणीत त्यांचे वारसदार ए. एच. मोतीवाला हे एकमेव व्यवसाय करीत असल्याचे माहिती स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांच्या पत्नी आर. एच. मोतीवाला यांनी दिली. निपाणी शुभरत्न केंद्र येथे आयोजीत पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला हे उपस्थित होते.
आर. एच. मोतीवाला म्हणाल्या, रत्नशास्त्रातील ज्योतिष्य विद्येची चौथ्या पिढीची परंपरा निपाणीत एच. ए. मोतीवाला यांनी जोपासली. मोतीवाला यांनी 25 वर्षापूर्वी निपाणी शुभरत्न केंद्र नावाने व्यवसाय सुरू केला. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि सिंधुदुर्ग या प्रदेशातील हजारो ग्राहकांचा विश्वास संपादीत करीत रत्नशास्त्रातील व्यवसाय केला. त्याचे 12 सप्टेंबर 2020 रोजी आकस्मित निधन झाले. त्यांनी हयातीत असतानाच आपले पुत्र ए. एच मोतीवाला यांना आपल्या सर्व कलेचे विद्यादान केले होते. त्यामुळे अखंडीत 5 वी पिढी रत्नशास्त्रात कार्यरत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला म्हणाले, वडिलांच्या निधनानंतर हजारो ग्राहकांची सेवा सुरू ठेवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. वडिलांप्रमाणे निपाणीतील एकाच शुभरत्न या दालनातून रत्नशास्त्रातील सेवा देत आहे. या सेवेतून हजारो ग्राहक समस्यामुक्त झाले आहेत. एच. ए. मोतीवाल यांनी आपल्या ह्यातील कोठेही शाखा काढली नाही. किंवा एकमेव वारसदार ए. एच. मोतीवाल यांना सोडून कोणालाही या विद्येचे ज्ञान दिले नाही.
तीच परंपरा आपण सांभाळीत आहे. मोतीवाला परिवारची निपाणी वगळता कोठेही शाखा नाही. किंवा अन्य कोणीही हा व्यवसाय करीत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी शुभरत्न केंद्राशी असलेला संबंध निपाणीशी निगडीत ठेवावा. इतरत्र कोणाही गैरसमज केल्यास त्यास शुभरत्न केंद्राचा संबंध राहणार नसल्याचे ए. एच. मोतीवाला यांनी सांगितले.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …