Monday , January 20 2025
Breaking News

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Spread the love

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे. ताप आणि वीकनेस आल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, कालपासूनच मनमोहन सिंग यांना तापाचा त्रास होत होता. पण आजही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्यांना एम्समध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अत्यावश्यक द्रवपदार्थ दिले जात आहेत.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला 88 वर्षीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य असलेल्या मनमोहन सिंग यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
रुटीन उपचारांसाठी रुग्णालयात-काँग्रेस
डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या आहेत. त्यांची प्रकृती ठीक असून नेहमीच्या तपासण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जर गरज वाटलीच तर आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती देत राहू, असं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी ठरला महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी.

Spread the love    पणजी : समक्य दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *