Monday , July 22 2024
Breaking News

बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे भीषण अपघात झाला. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला. रामस्नेहीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.
या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर १९ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उत्तर प्रदेशमधील लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस हरियाणाहून बिहारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाराबंकी येथील अयोध्या सीमेवरील कल्याणी नदी पुलावर डबल डेकर बसाचा एक्सल तुटल्याने बस थांबवण्यात आली होती.
मुसळधार पावसामुळे चालक व ऑपरेटर बस बाजूला लावून बस दुरुस्त करत होते.
दरम्यान, भरधाव वेगात लखनौच्या दिशेने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने बसला धडक दिली.
ही टक्कर इतकी जोरदार होती की त्यातील बहुतेक जागीच ठार झाले.
लखनौ पोलिस अधिकार पी. सत्य नारायण सबत म्हणाले, बाराबंकीतील राम स्नेही घाटाजवळ काल रात्री उशिरा एका ट्रकने बसला धडक दिली.
या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अद्यापही काही जणांची ओळख पटलेली नाही
बसमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे सबत म्हणाले. पहाटे तीनपर्यंत चार प्रवाशांचे मृतदेह अडकले होते. तर ११ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. तर बाराबंकी जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला.
एकूण १८ बस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुरेश यादव, इंदल महतो, सिकंदर मुखिया, मोनू सहनी, जगदीश सहनी, जय बहादुर साहनी, बैजनाथ राम, बलराम अशी नावे आहेत. तर अद्याप काही जणांची ओळख पटलेली नाही.
अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग पाच किलोमीटरपर्यंत रोखण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पोलिसांनाही सुमारे अर्ध्या तासानंतर घटनेची माहिती मिळाली.

About Belgaum Varta

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश

Spread the love  नवी दिल्ली : नीट-यूजी पेपल लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (१८ जुलै) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *