बेळगाव : शहरातील कॅम्प भागात 3.7 वर्षीय लहान मुलीवर दोघा युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशात कोरोना संकट अधिक गडद होत आहे. अशातच राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कॅम्पच्या स्वामी बेकरीजवळील कसाई गल्लीतील अल्पसंख्याक समुदायातील चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोघांवर त्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप करत संतप्त जमावाने हल्ला केलायं. पोलिसांनी याप्रकरणी नराधम आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिसरातील सर्व दुकानं बंद
कॅम्प येथे तणावाचं वातावरण
कॅम्प येथे मोठा पोलिस बंदोबस्त
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढला
बेळगावातील कॅम्प भागातील अँटोनी स्र्टीट येथे 10 दिवसांपूर्वी राहण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय रोषन डेव्हिड व अन्य एका अल्पवयीन युवकावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी हा पीडितेच्या घरा बाजुचा मुलगा आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संबंधित परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
