खानापूर (प्रतिनिधी) : संकटाना निवारण्यासाठी माणसाची नेहमीच धडपड असते. असेच पिण्याच्या पाण्याचे संकट निवारण्यासाठी नवा अभिनव यशस्वी झाला. निलावडे (ता. खानापूर) ही ग्रामपंचायत तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिजंगल व डोंगराळ भागात आहे.
याभागात कधीच वीजपुरवठा सुरळीत नसतो. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेटसावीत असतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जनरेटरचा वापर करून एक नवा अभिनव उपक्रम राबविला. त्यामुळे निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले.
त्यामुळे निलावडे गावच्या नागरिकांतून समाधान पसरले आहे. असे नविन अभिनव राबविण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया
निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या ही वीज पुरवठा खंडीत होत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून सतावत आहे. यासाठी यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जनरेटरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले.
– विनायक मुतगेकर, उपाध्यक्ष, ग्राम पंचायत, निलावडे
