पाटणा: बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएसोबत असणारी युती तोडली आहे. नितीश कुमार यांनी भाजपला दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. थोड्याच वेळात नितीश कुमार राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज सायंकाळी चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितली होती. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर आता बिहारमध्ये जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सरकारला काँग्रेसने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta