Tuesday , March 3 2026
Breaking News

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विजेच्या धक्क्याने १५ ठार

Spread the love

 

चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर आज (दि.१९) सकाळी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यात विजेच्या धक्क्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचावपथके घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.

“या दुर्घटनेत एका पोलिस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की रेलिंगवर करंट होता आणि तपासात अधिक तपशील समोर येईल,” अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

चमोलीच्या ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी अभियंता अमित सक्सेना यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री तिसर्‍या टप्प्यातील वीज खंडित झाली होती. बुधवारी सकाळी तिसरा टप्पा जोडण्यात आला, त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी डीएम चमोली यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. जखमींना डेहराडूनला आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जखमीच्या उपचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये, असेही सुचना त्यांनी दिल्या आहेत.

आता OTT वर शिव्या, अश्लिल कंटेंट चालणार नाही! काय म्हणाले अनुराग ठाकुर?

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *