नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये आज (दि. 22) पहाटे मोठी दुर्घटना घडली. वर्हाडाची बस दरी कोसळून 14 जण ठार झाले. चंपावतपासून 65 किलोमीटरवर हा अपघात झाला. घटनास्थळी आपत्तकालीन पथकासह पोलिस पोहचले. आतापर्यंत दरीतून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ककनई येथील लक्ष्मण सिंह यांच्या मुलाचे टनकपूरमधील पंचमुखी धर्मशाला येथे लग्न होते. सोमवारी रात्री उशिरा वर्हाडी बसने परतत होते. पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस थेट दरीत कोसळली. या अपघातात लक्ष्मण सिंह त्याचे 14 नातेवाईक मृत्युमुखी पडले. सर्व मृत हे ककनईमधील डांडा आणि कठौती गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
Check Also
तिबेटला भूकंपाचा तडाखा; 53 जणांचा मृत्यू
Spread the love तिबेट : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका …