Wednesday , May 29 2024
Breaking News

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, जगनमोहन रेड्डी जखमी

Spread the love

 

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या दगडफेकीत जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी विजयवाडा येथील सिंहनगर परिसरात प्रचार करत होते. यावेळी गर्दीतील अज्ञात व्यक्तीने भिरकावलेल्या दगडाने जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याचा वेध घेतला. दगड लागल्याने जगनमोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. दगडाच्या फटक्याने जगनमोहन रेड्डी यांचा डोळा काळानिळा पडला असून त्यांच्या भुवईच्या वरच्या भागातून रक्त येत होते.

या घटनेनंतर डॉक्टरांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर तातडीने उपचार केले. जगनमोहन रेड्डी यांच्या शेजारीच उभे असणारे आमदार वेलामपल्ली श्रीनिवास राव यांच्या डोळ्यालाही दगड लागल्याने दुखापत झाली आहे. मात्र, या घटनेनंतर जगन मोहन रेड्डी यांनी आपला रोड शो थांबवला नाही. प्राथमिक उपचारानंतर पुन्हा उभे राहत त्यांनी आपल्या समर्थकांना अभिवादन केले आणि आपला रोड शो पुढे सुरु ठेवला.

या घटनेनंतर वायएआर काँग्रेसच्या नेत्यांनी तेलुगू देसम पक्षावर आरोप केला आहे. तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर दगड फेकला असावा, असा त्यांचा संशय आहे. आंध्रप्रदेशमधील लोकसभेच्या 25 जागांसाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; दहा जणांचा मृत्यू

Spread the love  राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *